कल्याण: कल्याण मध्ये झाडावर वीज पडल्याने झाड घरांवर पडले, तीन घरांचे नुकसान,तीन जण....
Kalyan, Thane | Oct 21, 2025 कल्याण पश्चिम परिसरामध्ये आज अचानक सायंकाळच्या सुमारास लक्ष्मीपूजनाच्या वेळीच अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाट असं होत जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे 21 कल्याण पश्चिम परिसरातील अनुपम नगर येथील झाडावर पडली. त्यामुळे ते झाड बाजूला असलेल्या तीन घरांवर पडले असल्यामुळे तीन घरांचे नुकसान झाले आहेत. तसेच झाड अंगावर पडल्याने तीन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. आमची नुकसान भरपाई आम्हाला द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.