नागपूर शहर: विदर्भाचा थरकाप! पारा ४५ अंशांच्या पार जाणार; नागपूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होणार असून, येत्या पाच दिवसांत तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर विदर्भातील काही जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.