आज २ जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी साडे तीन वाजता अमरावती जिल्हा परिषद व शिक्षण विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले की, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण घडतात.