नागपूर शहर: घराची भिंत अंगावर पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही
यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दुर्दैवी घटनेत घराची भिंत अंगावर पडून एका अनोळखी मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना ५ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, विनोद भावे नगर, गल्ली क्र. १८ येथील रहिवासी चंदू हिरालाल शाहू यांच्या घरातील दुरुस्तीचे काम सुरू होते.