नागपूर शहर: बहीण भावाच्या नात्याला काळिमा !१४ वर्षांच्या सख्ख्या भावाने केला ९ वर्षांच्या बहिणीवर अत्याचार
नागपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच ९ वर्षांच्या सख्ख्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलाला ताब्यात घेतले.