यवतमाळ: शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करा ; ग्राहक पंचायतीची मागणी
यवतमाळ शहरातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना त्या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा अवघड आहे आहे. त्यामुळे हे सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ शहर शाखेतर्फे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.