घनसावंगी: श्रीपत धामणगाव येथील दलित वस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचाविरोधात आमरण उपोषण
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे श्रीपत धामणगाव येथील साठे नगर येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता व नाली कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मधुकर येले यांनी घनसावंगी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते मधुकर येले यांनी केलेल्या आरोपानुसार, संबंधित एजन्सीने साठे नगरमध्ये प्रत्यक्षात सिमेंट रस्ता व नालीचे काम केले नसतानाही ग्रामपंचायतीतील