दर्यापूर: "तू माझ्याशी बोलली नाहीतर,तुला पाहून घेईल,बसस्थानकात तरुणीला धमकी;तरुणीची तरुणाविरुद्ध दर्यापूर पोलिसात तक्रार
दर्यापूर शहरातील बस स्थानक परिसरात एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करून तू माझ्याशी बोलली नाहीतर मी तुला पाहून घेईल अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याची घटना २७ डिसेंबर २०२५ रोजी सायं ५:३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी तरुणी ही बस स्थानक दर्यापूर येथे थांबलेली असताना आरोपी वैभव ऊर्फ लड्डू देवांनद कोकाटे (वय २२, रा. कळमगव्हाण ता.दर्यापूर याने तरुणीशी अश्लील शब्दात बोलण्याचा प्रयत्न केला.