लातूर: लाईट बिलावरील नावातील बदल दुरुस्ती होणार आता ७ दिवसांच्या आत; अर्जांना स्वयंचलित मंजुरी,महावितरण ची माहिती
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर -दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने ग्राहक नावातील बदलाची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. वीज बिलावरील नावातील बदलासाठी आता ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रिया केवळ तीन ते सात दिवसांत पूर्ण होणार आहे.लातूर महावितरणने 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी या बदलासाठी एक महिन्याचा कालावधी लागू होत होता.