औंढा नागनाथ: नगराध्यक्षपदी कपिल खंदारे,उपनगराध्यक्षपदी मनोज देशमुख यांची बिनविरोध निवड;आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सत्कार
औंढा नागनाथ येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची दिनांक १० आक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान निवड करण्यात आली यामध्ये नगराध्यक्षपदी कपिल खंदारे तर उपनगराध्यक्षपदी मनोज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती साठी राखीव आहे कपिल खंदारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज देशमुख यांचाही एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर आमदार संतोष बांगर यांनी भव्य सत्कार केला