नागपूर शहर: ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; गणेशपेठ पोलिसांकडून तपास सुरू
13 मे ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिर आणि शीतला माता मंदिर परिसरातील जुन्या रामझुल्याखाली एका अंदाजे ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज उघडकीस आली असून, अद्याप मृतकाची ओळख पटलेली नाही.माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे पुढील तपास सुरू आहे.