नागपूर शहर: स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी वरून काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आमदार नितीन राऊत यांनी व्यक्त केली नाराजी
नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी या प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या समर्थकाला संधी न दिल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. दोन्ही उमेदवार शहराध्यक्षांच्या गटातूनच देण्यात आल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.