नागपूर शहर: थरारक व्हिडिओ व्हायरल !खापरखेड्यात दोन गटांत सशस्त्र गँगवार; ६ कुख्यात गुंडांसह १२ जणांवर गुन्हा दाखल
खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत वॉर्ड क्रमांक-२ मध्ये जुना वाद आणि सोशल मीडियावरील चॅलेंजवरून रविवारी रात्री गुन्हेगारांच्या दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. या हल्ल्यात हिमांशूसह काही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूरज कावळे व त्याच्या साथीदारांनी चाकू, तलवारी आणि काठ्यांच्या सहाय्याने वारं केले.