नागपूर शहर: नागपूर पोलिसांच्या पुढाकाराने 'संडे ऑन सायकल' उपक्रम उत्साहात संपन्न
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत 'फिट इंडिया' मोहिमेचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या "संडे ऑन सायकल"या उपक्रमाला आज नागपूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.पोलीस जिमखाना, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथून या रॅलीची सुरुवात झाली.नागपूरचे सहपोलीस आयुक्त श्री. नविनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली