नाशिक: जुना गंगापूर नाका, सप्तशृंगी कॉलनी येथे घरफोडी करून चोरट्यांनी 6 लाख 48 हजारांचा मुद्देमाल नेला चोरून
Nashik, Nashik | Sep 18, 2025 जुना गंगापूर नाका, सप्तशृंगी कॉलनी येथे घरफोडी करून चोरट्यांनी 6 लाख 48 हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून दुपारी एक वाजता सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी उत्तम बापूराव पवार राहणार सप्तशृंगी कॉलनी, जुना गंगापूर नाका यांच्या राहत्या बंगल्याचा दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे तीन मंगळसूत्र,सोन्याच्या दोन बांगड्या व चांदीची पळी व इतर दागिने चोरी करून नेले.