प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ग्रामीण जनतेला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत दर्जेदार उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण दिल्याबद्दल डॉ. कांचन मश्याखेत्री (कोटगले), वैद्यकीय अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्र: कोढा
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार' आणि 'महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६' मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भंडारा जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री ना. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.