हदगाव: हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ जेसीबी, आयचर टेम्पो आणि कारचा भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू, तर 8 जन गंभीर जखमी
Hadgaon, Nanded | Oct 18, 2025 आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान हदगाव तालुक्यातील भानेगाव येथे लातूर येथील देगुरे कुटुंब चंद्रपूरला कारने जात होते. भानेगाव फाट्याजवळ महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी फिरणाऱ्या जे सी बी आणि आयचर टेम्पोमध्ये आणि देगुरे कुटुंबाच्या गाडीमध्ये विचित्र अपघात घडला. ही तिन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला. यात कर गाडी चालवणारा मनोज आणि त्याची बहीण मंजुषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर देगुरे कुटुंबातील सात जन आणि आयचर टेम्पो चालक असे आठ जन गंभीर जखमी झाले.