हिंगणघाट: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पदी मनीष देवडे तर शहर प्रमुखपदी चंदू भुते यांची नियुक्ती
हिंगणघाट शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने हिंगणघाट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुकाप्रमुख मनीष देवडे, शहर प्रमुखपदी चंदू भुते यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून प्रसिद्धी सामना या वर्तमानपत्रातील प्रकाशित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे