हिंगणघाट: गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्यावर महार्गावरील मोठा मारोती मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मोठा मारोती मंदिराजवळ वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करीत २.१०९ किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ, मोपेडसह १ लाख ७७ हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.हि कारवाई पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.