हिंगणघाट: वडनेर येथील सविधान चौकात दारू वाहतूकी विरोधात वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही
हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वडनेर येथील सविधान चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा येथील पथकाने कार क्रमांक एम.एच.४९ बी.बी.२६४९ वर कारवाई करीत ९ लाख ६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत गर्जन बिरबल खैरे, वय ४० वर्ष ,सुजल हनुमान पदीले, वय १९ वर्ष,दोन्ही राहणार करंजी, ता.पांढरकवडा, जि. यवतमाळ यांना अटक केली आहे. हि कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे,याच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.