हिंगणघाट: मुंबई येथील बैठकीत पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरण करण्यासंदर्भात आमदार कुणावार यांनी मांडले महत्वाचे मुद्दे
शेतपाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महसूल मंत्री शेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या समितीचे सदस्य आमदार समिरभाऊ कुणावार यांनी बैठकीत पांदन रस्त्यासंबधी शेतकऱ्यांच्या अडचणी त्याचे मजबूती करण यासह शेतकरी हिताचे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. राज्यातील ग्रामीण व शेतीप्रधान भागांमध्ये शेत रस्त्यांची आणि पाणंद रस्त्यांची स्थिती सुधारण्याची तीव्र गरज असल्याचे मत व्यक्त केले.