कराड: कृष्णा विश्व विद्यापीठ देणार कराड शासकीय रुग्णालयाला मोफत आरोग्यसेवा; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची माहिती
Karad, Satara | Sep 24, 2025 कराड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले आणि पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील शासकीय रुग्णालय असलेल्या स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आता कृष्णा विश्व विद्यापीठ वैद्यकीय सेवा देणार आहे. या संदर्भात राज्य सरकार बरोबर बोलणे झाले असून मुकसंमती मिळाली आहे. प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री कामकाज पूर्ण होईल आणि लवकरच चांगली वैद्यकीय सेवा बहाल केली जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.