नागपूर शहर: बांधकाम साईटवर महिला आणि मजुरामध्ये वाद; महिलेने गुप्तांगावर वार करत मजुराला केले गंभीर जखमी
31 जुलैला सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या बेलतरोडी थाना क्षेत्रातील एक बांधकामाधीन साईट वर ४५ वर्षीय रामचरण मडावी आणि ३५ वर्षीय महिला मजुरांनी मद्यप्राशन केले होते. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. मजुराने महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.याला विरोध करत महिलेने स्वयंपाकघरातील शस्त्र उचलून रामचरणच्या गुप्तांगावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.जखमी मजुराला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी रात्रीच त्याचे ऑपरेशन केले