तुमसर तालुक्यातील बाम्हणी येथील शेतशिवारात शेतातील पाण्याचा मार्ग आणि धान्याच्या नुकसानीवरून दोन गटात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की यात दोन्ही बाजूंच्या व्यक्तींनी एकमेकांना बांबूच्या काठीने मारहाण केली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले आहेत. पहिला गुन्हा प्रमोद तुकाराम चावके (वय ६०) यांच्या तक्रारीवरून दाखल झाला. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वा. जितेंद्र केशव सेलोकर (वय ४२) यांनी