महागाव: तालुक्यातील वागद येथे पशुसंवर्धन जागरूकता अभियानाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
महागाव तालुक्यातील वागद येथे काळी (दौ) पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने आयोजित पशुसंवर्धन जागरूकता अभियानाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. आज दि २८ नोव्हेंबर रोजी दुपारी३ वाजताच्या दरम्यान शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत हे महत्त्वपूर्ण कृती शिबिर पार पडले. सध्या ग्रामीण भागात जनावरांमध्ये तोंडखुरी आणि पायखुरी या गंभीर संसर्गजन्य रोगांची साथ वेगाने पसरत आहे. खाजगी डॉक्टरांकडील औषधोपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने पशुपालक हवालदिल झाले होते.