विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप झाला. बहुजन आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी हा आरोप केला. त्यामुळं हे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. आप्पा मला वाचवा असे हितेंद्र ठाकूर यांना फोन आल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना हितेंद्र ठाकूर यांनी दिली.