पनवेल: उलवे डिव्हायडर टॉवरची होणार चौकशी
Panvel, Raigad | Apr 17, 2026 नवी मुंबईतील उलवे येथे रस्त्यांच्या डिव्हायडरवर उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरांच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले असून, या वादग्रस्त प्रकल्पाची आता अधिकृत पातळीवर छाननी सुरू झाली आहे.