नागपूर शहर: किरकोळ वादातून कारचालक डॉक्टरांना भरचौकात हेल्मेटने बेदम मारहाण;व्हिडिओ वायरल
.उपराजधानीतील गजबजलेल्या अजनी चौकात एका दुचाकीस्वाराने कारचालकाला भररस्त्यात हेल्मेटने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, मारहाण करणारा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अजनी चौकातून जात असताना कार आणि दुचाकीमध्ये किरकोळ घासले गेल्याने वाद उद्भवला.