तुमसर: मच्छेरा येथे २७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, घटनेचा मर्ग सिहोरा पोलिसात दाखल
तुमसर तालुक्यातील मच्छेरा येथे एका 27 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 21 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी 10 वा.च्या सुमारास उघडकीस आली. यातील विशाल वासुदेव धावडे राहणार सिहोरा तालुका तुमसर असे मृतक तरुणाचे नाव असून तो आपल्या शेळ्यांसाठी चारा आणण्याकरिता मच्छेरा येथील गिट्टी प्लांटच्या मागील परिसरात गेला असता. पाण्याच्या खोल खड्ड्यात त्याचा पाय घसरला. याप्रकरणी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग सिहोरा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.