नागपूर शहर: हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचण्यावरून राडा; तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला: संतोष मुढे सहाय्यक पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मुढे यांनी 7 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लग्न समारंभाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून दोन तरुणांनी तीन जणांवर चाकूने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मुढे यांनी दिली आहे.