नागपूर शहर: अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राजू बोचे नागपुरातून ताब्यात
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राजू विठ्ठलराव बोचे याला २३ एप्रिल रोजी रविभवन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा रवी भवन येथे जेवण करण्यासाठी आला होता. याप्रकरणी फतेह अली खान रफत उल्ला खान पटेल यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. आरोपीचा ताबा घेण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले असून, लवकरच त्याला पोलीस कोठडीत घेतले जाईल.