नाशिकमधील बोधले नगर परिसरात घरगुती वादातून एका भावाने दुसऱ्या भावाचा लाकडी दांडक्याने मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास सुयोग नगर, आरटीओ कॉलनीजवळ फिर्यादी रेखा बोरसे यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. भंडाऱ्यातील प्रसाद घरी आणण्याच्या कारणावरून आरोपी सनी बोरसे याने भाऊ योगेश उर्फ बाळा बोरसे याच्याशी वाद घातला. वादाचे