ठाणे: वाशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीची मनपा आयुक्तांनी पाहणी करून चौकशीचे दिले आदेश, चार जणांच्या मृत्यूचे सांगितले कारण
Thane, Thane | Oct 21, 2025 वाशीतील सेक्टर क्रमांक 14 येथे रहेजा रेसिडेन्सी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. माहिती करता सगळे घटनास्थळी दाखल झाल्या आणि अनेकांची सुखरूप सुटका केली. मात्र बेडवर झोपलेल्या एका वृद्ध महिला आणि एका घरातील तीन जण आग लागल्यामुळे बाथरूम मध्ये लपून बसले होते त्यामुळे तेथे ऑक्सिजन कमी पडला आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली. तसेच आगीचे कारण कळू शकले नसले तरी याचा तपास करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले.