नागपूर शहर: गोवंश तस्करी प्रकरणी कुख्यात मोहम्मद वकील कुरेशीसह टोळीवर 'मोका' अंतर्गत कार्यवाही : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 13 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार तहसील पोलिसांनी गोवंश तस्करी आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या गंभीर गुन्ह्यांत कुख्यात गुन्हेगार मोहम्मद वकील कुरेशी आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर 'मोका' अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.