मानगाव: कोकणकन्या एक्स्प्रेसला माणगाव थांबा द्या
Mangaon, Raigad | Apr 17, 2026 कोकण कन्या एक्स्प्रेस सुरू झाली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव येथील रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने दक्षिण रायगड मधील सात तालुक्यातील हजारो रेल्वे प्रवाशांना लाभ मिळत नाही. त्यामुळे माणगाव येथील रेल्वे स्थानकावर कोकण कन्या एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.