नागपूर शहर: कळमण्यात प्रेमसंबंधातून तरुणावर जीवघेणा हल्ला; मित्रही जखमी : प्रमोद ढोबळे पोलीस उपनिरीक्षक
कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद ढोबळे यांनी 29 एप्रिलला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीने पीडित तरुणासोबतच त्याला वाचवण्यासाठी आलेल्या शेख अयान शेख कलंदर या मित्रावरही धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयित आरोपींची ओळख पटली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.