पनवेल: नेरूळ पोलिसांनी शिरवणे परिसरातून अल्पवयीन गुन्हेगारास केली अटक, 72 हजारांचा मुद्देमाल जप्त
Panvel, Raigad | Apr 4, 2024 दिवसा घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारावर नेरूळ पोलिसांनी कारवाई केली आहे. शिरवणे परिसरातून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आयान खान असे त्याचे नाव असून तो करावे परिसरात राहणारा आहे.नेरूळ परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता. पोलिसांनी शिरवणे परिसरात सापळा रचला होता. यामध्ये अल्पवयीन मुलगा परिसरात वावरताना आढळून आला. यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.