जालना: सतत वीजपुरवठा खंडित स्थानिक नगरसेवकांनी मोतीबाग येथील महावितरण कंपनी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Jalna, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमार जालना शहरातील संजय नगर भवानी नगर तसेच इतर भागात मागील काही दिवसापासून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे आणि विशेष बाब म्हणजे रात्रीचा हा वीज पुरवठा खंडित होत आहे, त्यामुळे नागरिकांना व स्थानिक रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे या सर्व त्रासाला कंटाळून आज स्थानिक नगरसेवकांनी एकत्रित नागरिकांना घेऊन मोतीबाग येथील महावितरण कंपनी कार्यालय गाठक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना चांगलीच धारेवर धरले आहे.