नागपूर शहर: एफडीए ॲक्शन मोडवर , अस्वच्छता आणि अन्नात भेसळप्रकरणी प्रसिद्ध 'इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स'वर कारवाई
नागपुरात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम तीव्र करण्यात आली असून, हिरा स्वीटच्या कारवाईनंतर आता 'इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स' या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे