जळगाव: मंत्री गुलाबराव पाटील व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यात कलगीतुरा रंगला
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना पाळधी गावात येऊन तर बघा असे आवाहन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी देखील त्यांचे आवाहन स्वीकारले असून पाच ऑक्टोबरला मी जळगाव जिल्ह्यात येणार असून तुम्ही निमंत्रण दिले तर मी नक्की येईल असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता अमरावती येथे माहिती देताना म्हटले आहे.