भंडारा: पवनीत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पवनी पोलिसांनी गोसेखुर्द-अड्याळ रस्त्यावर अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या दीपक राऊत याला पकडले. एक पॉवरट्रॅक ट्रॅक्टर, ट्रॉली आणि १ ब्रास रेती असा ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.