खंडाळा: गाडी चालवण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण : लोणंद पोलिसांनी कारवाई करत दोघांना घेतले ताब्यात
सासवड-तरडगाव रस्त्यालगत मदनेवस्ती येथे पारधी समाजातील नागेश रमेश भोसले वय 26 व त्याच्या कुटुंबीयांवर लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवार दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. लोणंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. लोणंद पोलीस ठाण्यातून सोमवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नागेश भोसले याने फिर्याद दिली आहे. आरोपी रोहित दत्तात्रय चव्हाण, सोमनाथ दत्तात्रय चव्हाण दोन्ही रा. मदनेवस्ती यांना अटक करण्यात आली आहे.