लातूर – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छ आणि कचरामुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासाठी लातूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने मनपा आयुक्त मानसी, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसुळे, क्षेत्रीय अधिकारी बंडु किसवे आणि प्रमुख स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे यांनी आज, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्र. 11 आणि 12 मधील नव्याने उभारण्यात आलेल्या निरुपयोगी वस्तू संकलन केंद्रांना भेट देत तयारीचा आढावा घेतला