नागपूर शहर: सदर परिसरात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ९ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश घोगरे आणि त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गोवा कॉलनी रेल्वे लाईनजवळील मोकळ्या मैदानात काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत आहेत.