नागपूर शहर: फुटाळा तलाव येथे तीस वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
5 एप्रिल ला सायंकाळी 6:00 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार चार एप्रिलला पोलीस ठाणे अंबाजरी हद्दीतील फुटाळा तलाव येथे तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नसून त्याच्या हातावर कमला असे गोंदलेले आहे. दरम्यान कोणीही ओळखत असल्यास अंबाझरी पोलीस संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तुर्तास अंबाझरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.