फलटण: मूळ अपक्षाचं असलं तरी मी 'या' पक्षात राहील असेही नाही; आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सूचक विधान
Phaltan, Satara | Oct 20, 2025 पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीसाठी आपण आढावा बैठक बोलावली होती, परंतु कार्यकर्त्यांचा सूर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे झुकला. तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय?, निर्णय घ्या?, आपण कुठल्या पक्षात जायचे?, या प्रश्नांना उत्तर देताना मी सांगेन आपलं मुळंच अपक्षाचं आहे, तरीही मी कुठल्या पक्षात जाणार नाही, असेही नाही. आपल्या सर्वांसाठी पक्ष गौण आहे,' असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.