नागपूर शहर: दाभा हद्दीत दरोडा टाकल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला आले यश
9 एप्रिल ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार दाभा येथे अल्पवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवून घरात घुसून दरोडा टाकल्याप्रकरणी गणेशा का युनिट दोनच्या पथकाने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव साहिल ढोके असे सांगण्यात आले आहे आरोपीविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी आरोपीला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.