मानगाव: हिरव्या तरव्यावर अस्मानी संकट
Mangaon, Raigad | Jun 30, 2026 माणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन दिवसांच्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीला मोठा दिलासा मिळाला होता. या पावसामुळे भाताच्या रोपवाटिकांना नवसंजीवनी मिळाली असून अनेक शेतांमधील तरवे हिरवीगार आणि तजेलदार दिसू लागली आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने भात लागवडीची कामे पुन्हा ठप्प झाली असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.