मोर्शी: शिरखेड ठाणेदाराची दमदार एन्ट्री, शिरखेड ते लेहगाव मार्गावरून लाखो रुपयांचा गुटखा वाहनासहित जप्त
शिरखेड पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या दमदार एन्ट्री ने परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचे धाबे दणाणले असून शिरखेड पोलीस स्टेशनला रुजू होताच दिनांक 10 नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता शिरखेड ते लेहगाव मार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक वर कारवाई करून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांचे मार्गदर्शनात शिरखेड पोलिसांकडून सुरू आहे