जळगाव: एरंडोल तालुक्यातील उतरान गावाला पुराचा वेढा
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नद्यांना पूर आले आहे .एरंडोल तालुक्यातील उत्राण परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे .गावानजीक असलेल्या नाल्याचे पुराचे पाणी गावात शिरल्याने गावाला पुराच्या पाण्याचा वेढा असून गावात असून अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.